अंडा पराठा

अंडा पराठा

साहित्य

• २ वाट्या कणीक
• मीठ
• ४ टेबलस्पून मोहनासाठी पातळ डालडा आतील सारण • ३-४ अंडी
• १ कांदा
• ४-५ हिरव्या मिरच्या
• थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
• १/२ चमचा गरम मसाला
• मीठ

कृती

• अंडी फोडुन घ्यावीत. थोड्या तुपावर कांदा परतून घ्यावा. नंतर त्यावर फोडलेली अंडी, मीठ, मिरच्यांचे तुकडे, मसाला घालून हलवावे.

• अंड्याचे मिश्रण शिजल्यासारखे वाटले की उतरवावे. कोथिंबीर घालावी व थंड होऊ द्यावे.

• कणकेत मीठ व डालड्याचे मोहन घालून घट्ट भिजवावी. १/२ तास पीठ झाकून ठेवावे. नंतर त्याच्या दोन पुर्या लाटून घ्याव्यात.

• एकावर वरील अंडयाचे मिश्रण थोडे पसरुन त्यावर दुसरी पुरी ठेवावी.

• कडा जुळवून घ्याव्यात व जरा लाटावे. नंतर तव्यावर दोन्हीकडून शेकून घ्यावी व बाजूने तूप सोडावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.