आलू टिक्की

आलू टिक्की

साहित्य

• चार बटाटे , लिंबू अर्धा
• चार ब्रेड स्लाईस
• अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
• चार ते पाच हिरव्या मिरच्या
• दोन चमचे मक्याचे पीठ
• थोडी हळद , तळण्यासाठी तेल
• चवीनुसार मीठ .

कृती

• बटाटे उकडून कुस्करून घ्यावेत . ब्रेड पाण्यात टाकावा व लगेच पाण्यातून काढून दाबून घ्यावा मग टो बटाट्यात टाकून ते मिश्रण एकजीव करावे .

• त्यात हिरवी मिरची बारीक चिरून , कोथिंबीर , हळद व लिंबू पिळून टाकावा . चवीनुसार मीठ टाकावे .

• या मिश्रणाचे चपटे गोळे बनवून ते मक्याच्या पिठामध्ये घोळवावेत व तेलात तांबूस रंगावर तळावेत. चिंच चटणीबरोबर अथवा सॉससोबत गरम-गरम खावेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.