आलू पराठा

आलू पराठा

साहित्य

• २ वाट्या कणीक
• अर्धा चमचा मीठ
• २ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन
• ३ मोठे उकडलेले बटाटे
• ७-८ लसूण पाकळ्या
• ५-६ हिरव्या मिरच्या वाटून
• १ चमचा अनारदाणा पावडर किंवा आमचूर पावडर
• मीठ
• साखर चवीनूसार
• पराठे तळ्ण्याकरता तेल अथवा तूप

कृती

• कणीक कडकडीत तेलाचे मोहन, मीठ, साखर घालून घट्ट भिजवून झाकून ठेवावी.

• बटाटे गरम असतानाच सोलून किसणीला तेलाचा हात लावून किसून घ्यावेत, किंवा पुरणयंत्रातून काढून घ्यावेत.

• किसलेल्या बटाट्यात वाटलेली लसूण, मिरची, साखर, मीठ, अनारदाणा पावडर किंवा आमचुर पावडर घालून गोळा तयार करावा.

• भिजलेली कणीक हातानी मळून घ्यावी व तिचे आठ समान भाग करावेत. बटाट्याच्या सारणाचेपण तेवढेच सारखे भाग करावेत.

• कणकेच्या एका भागाची हाताने खोलगट वाटी करावी. त्यात सारणाची एक लाटी भरून लाटीचे तोंड सर्व बाजूंनी बंद करुन हलक्या हाताने गोल पराठा पोळपाठावर पिठी लावून लाटावा.

• जाड अथवा नॉनस्टिक तव्यावर तूप किंवा रिफाइंड तेल टाकुन दोन्ही बाजूंनी खमंग परतावा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.