उकड हंडी

उकड हंडी

साहित्य

• बटाटे , वांगी
• सुरण , रताळ
• गाजर , फ्लॉवर
• नवलकोल , मटाराचे दाणे
• गवारीच्या शेंगा , पडवळ
• तांबडा भोपळा
• भोपळी मिरच्या आणि कांदे
• थोडी कोथिंबीर .
• भाज्यांचं प्रमाण आवडीनुसार घ्यावं . सर्व मिळून अंदाजे दोन किलो भाज्या असाव्यात .

मसाला :-

• तिखट अर्धी वाटी
• काळा मसाला अर्धी वाटी
• मीठ एक टेबलस्पून
• मोठया लिंबाएवढा गुळ
• अर्ध्या नारळाचं खोबरं
• हळद आणि दीड वाटी तेल .

कृती

• बटाटे , सुरण , नवलकोल आणि तांबडा भोपळा याच्या मोठया चौकोनी फोडी कराव्यात आणि गाजरं , वांगी , रताळी यांचे गोल जाड काप करावेत .

• पडवळाचे जरा मोठे लांब गोल काप करावेत . गवारीच्या शेंगा निवडून सबंधच ठेवाव्यात .

• फ्लॉवरचे मोठे तुरे काढावेत . कांद्याची सालं काढून भरण्यासाठी चिरा द्याव्या .

• कोथिंबीर बारीक चिरावी . सर्व मसाला एकत्र करून कालवावा . कांद्यात आणि पडवळात भरावा .

• सगळ्या भाज्या आणि उरलेला मसाला एकत्र करावा . त्यावर कच्चं तेल घालून कालवावं .

• नंतर सर्व भाज्या जाड बुडाच्या पातेल्यात घालाव्यात . मंदाग्निवर ठेवाव्यात .

• मधून मधून पातेलं कपड्यानं धरून अवसडाव्यात . भाजी शिजल्यावर उतरवावी .

• पूर्वी ही उकडहंडी मातीच्या मडक्यात करत असत .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.