उपवासाचा दहिवडा

उपवासाचा दहिवडा

साहित्य

• उकडून घेतलेले बटाटे मध्यम आकाराचे चार
• दीड वाटी उपवासाची भाजणी
• राजगिरा व शिंगाडा पीठ प्रत्येकी एक चहाचा चमचा
• दाणेकूट एक कप
• दही मोठ्या तीन वाट्या
• हिरव्या मिरच्या २/३
• जिरे एक चिमूट
• आले वाटण एक चहाचा चमचा
• तिखट
• मीठ
• चिरलेली थोडी कोथिंबीर
• तूप तळणीसाठी

कृती

• एका परातीत उकडून साले काढलेले बटाटे, दाणे कूट, सर्व पीठे, तिखट, मीठ घ्या.

• सर्व पदार्थ एकजीव मळून घ्या. या मिश्रणाचे लाडूच्या आकाराचे लहानसर गोळे करा.

• कढईत तूप गरम करा. हे गोळे लालसर रंगावर तळून घ्या. नंतर एका रुंद तोंडाच्या भांड्यात किंवा पसरट बाऊलमध्ये दही घ्या.

• त्यात मिरची, आले वाटण, मीठ घाला. दही तसेच पाणी न टाकता रवीने घुसळून घ्या.

• यात तळलेले गोळे टाका. वरून चिरलेली कोथिंबीर पेरा आवडत असेल तर काही वेळ फ्रिजमध्ये ठेवा. नंतर खा.

विशेष म्हणजे उपवास नसेल तरीही खाऊ शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.