उपवासाचे अनारसे

उपवासाचे अनारसे

साहित्य

• जरुरीप्रमाणे वरई तांदूळ
• साखर किंवा गूळ
• खसखस
• तूप

कृती

• वरई तांदूळ तीन दिवस भिजत ठेवावेत.

• मग उपसून स्वच्छ कपड्यावर अर्धवट वाळवावे. नंतर खलबत्त्यात चांगले बारीक कुटून घ्यावेत.

• यात जेवढे पीठ त्याच्या निमपट साखर किंवा गूळ आणि तुपाचे मोहन घालून पीठ चांगले भिजवून घ्यावे. झाकून ठेवावे.

• नंतर दुसरे दिवशी नेहमी अनारसे करतो तसे अनारसे थापावेत.

• त्यावर खसखस लावावी. लालासर रंगावर तळून घ्यावेत. सुंदर दिसतात. आणि लागतातही चविष्ट.

उपवास नसेल तरीही खाऊ शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.