कटाची आमटी

katachi-aamti-recipe-marathi

katachi-aamti-recipe-marathi

कटाची आमटी

साहित्य :

चण्याच्या डाळीचा कट

अर्धी वाटी गूळ

दोन चमचे लाल तिखट

चवीप्रमाणे मीठ

एक चमचा काळा (गोडा) मसाला

एक चमचा जिरे

पाव वाटी सुके खोबरे

चार लवंगा

तमालपत्र चार पाने

दालचिनी चार-पाच तुकडे

फोडणीचे साहित्य

कढीपत्ता

कृती :

चण्याची डाळ जास्त पाणी घालून शिजवावी. पूर्ण शिजल्यानंतर ती चाळणीत ओतावी. खाली निथळलेले पाणी म्हणजे कट.

हा कट घेऊन, तो शिजावयास ठेवून पाणी घालावे.

तिखट, मीठ व गूळ घालावा. जिरे व सुके खोबरे भाजून आणि वाटून घालावे.

काळा मसाला घालावा. लवंगा, तमालपत्र, दालचिनी व कढीलिंब घालून नेहमीप्रमाणे फोडणी करावी व ती वरून घालावी व आमटी चांगली उकळावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.