कणकेचे थालिपीठ

कणकेचे थालिपीठ

साहित्य

• १ वाटी कणिक
• २ चमचे तीळ (पांढरे)
• १ मध्यम कांदा
• २ हिरव्या मिरच्या
• १ चमचा मीठ
• ३ चमचे तेल
• तळण्यासाठी तेल.

कृती

• कांदा व मिरच्या बारीक चिराव्यात. कणकेत घालून पीठ, तीळ व ३ चमचे तेल त्यात मिसळावे. लागेल तसे पाणी वापरून कणिक मऊसर भिजवावी.

• केळीच्या पानावर किंवा प्लॅस्टिकच्या कागदावर थापून, तेल सारवलेल्या तव्यावर गुलाबी रंगावर भाजावीत.

• बाजूने तेल सोडावे व दोन्ही बाजू शेकल्यानंतर गरमगरम खायला द्यावीत. बरोबर लोणी, तूप व आंब्याचे लोणचे द्यावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.