कांदा पराठा

कांदा पराठा

साहित्य

• एक वाटी कणीक
• अर्धी वाटी मैदा
• एक मोठा चमचा तुपाचं मोहन
• अर्धा चमचा मीठ
• अर्धा चमचा साखर
• दोन कांदे अगदी बारीक चिरून किंवा किसून + चवीपुरतं मीठ + चिमुटभर साखर + अर्धा चमचा तिखट हे मिश्रण कालवून .

कृती

• मीठ-साखर आणि तुपाचं मोहन घालून कणीक व मैदा भिजवून घ्यावा.

• त्याचे मध्यम आकाराचे बारा फुलके करावेत . आता एका फुलक्यावर कांद्याचं मिश्रण पसरावं.

• त्यावर दुसरा फुलका कडा दाबून चिकटवावा आणि हलक्या हातानं लाटावा व तव्यावर शेकावा.

• अगदी खायला घेतांना पुन्हा तेल सोडून खरपूस भाजावा . उरलेल्या फुलक्यात पाच पराठे करावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.