केळ्याचे वडे(आंडीयुक्त )

केळ्याचे वडे(आंडीयुक्त )

साहित्य

• ९ पिकलेली हिरव्या सालीची केळी
• अर्धा नारळ
• ८ हिरव्या मिरच्या
• दीड वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
• ७-८ लसूण पाकळ्या
• १ चमचा मीठ
• अर्धा चमचा मिरेपूड
• १ चमचा जिरे
• तळणीसाठी तेल किंवा तूप
• ४ अंडी
• १ वाटी वाळलेल्या ब्रेडचा चुरा
• १ लिंबू

कृती

• नारळाचा चव, मिरच्या, कोथिंबीर, लसूण, मीठ, जिरे, मिरेपूड एकत्र करून याची चटणी वाटावी.

• त्यावर लिंबाचा रस घालून चटणी मिसळावी. अंडी खूप फेटून ठेवावी.

• प्रत्येक केळ्याचे तीन तुकडे करावे. प्रत्येक तुकडा मधे अर्धा चिरावा व त्यात थोडी चटणी भरावी. असे सर्व तुकडे तयार ठेवावे.

• कढईत तेल तापत ठेवावे. केळ्याचा तुकडा ब्रेडच्या चुऱ्यात घोळवावा.

• फेटलेल्या अंड्यात बुडवावा व जरा निथळून कढईत तळावा.

• हे तिखट-गोड वडे सर्वांना आवडतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.