कोकोनट राईस

कोकोनट राईस

साहित्य

• १/२ कप तांदूळ
• १/२ कप खवलेला ताजा नारळ
• २ टेस्पून तेल
• १/२ कप शेंगदाणे
• २ टिस्पून उडीद डाळ
• १ टेस्पून चणा डाळ
• १/४ टिस्पून मोहोरी
• १/४ टिस्पून हिंग
• १ कढीपत्ता टाहाळी
• ३-४ लाल सुक्या मिरच्या
• १/२ टिस्पून किसलेले आलं
• चवीपुरते मीठ

कृती

भात मोकळा शिजवून घ्यावा. शिजवताना भातात मीठ घालावे. भात शिजला की ताटात मोकळा करून ठेवावा. कोमट झाला की ओलं खोबरं घालून मिक्स करावे. आवडीनुसार खोबरं कमीजास्त करावे.

• तेल कढल्यात गरम करावे. आच मध्यम ठेवावी. आधी शेंगदाणे घालावे. खमंग तळून बाजूला काढावे. अशाच प्रकारे चणा डाळ आणि उडीद डाळ तळावी. हे सर्व भातावर घालावे.

• उरलेल्या तेलात फोडणी करावी. मोहोरी, हिंग, कढीपत्ता, किसलेले आले आणि लाल मिरच्या घालाव्यात. ही फोडणी भातावर घालावी.

• हलक्या हाताने भातात मिक्स करावे. तयार भात थोडा गरम करायचा असल्यास मायक्रोवेव्हमध्ये गरम करावा. किंवा जाड कढईत मंद आचेवर झाकण ठेवून ३-४ मिनिटे गरम करावा.

टीप:

१) हा भात कोणत्याही रस्सा भाजीबरोबर चांगला लागतो. किंवा टॉमेटो चटणीबरोबरही छान लागतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.