गव्हाच्या रव्याचा उपमा

गव्हाच्या रव्याचा उपमा

साहित्य

• पाव किलो गव्हाचा जाडसर रवा
• १ वाटी चणा डाळ
• ४ चमचे खोबरे
• कोथिंबीर
• ४-५ हिरव्या मिरच्या
• मीठ
• अर्धी वाटी तेल
• चवीपुरती साखर
• फोडणीचे साहित्य

कृती

• गव्हाचा रवा थोड्या पाण्यात कुकरमध्ये शिजवून घ्यावा. डाळ भिजवून ती जाडसर वाटून घ्यावा.

• मिरची डाळीबरोबरच मिक्सरमध्ये फिरवून घ्यावी. अर्धी वाटी तेलात हिंग, जिरे, हळद, मोहरी घालून फोडणी तयार करावी व त्यात वाटलेली डाळ परतून घ्यावी.

• नंतर त्या डाळीत शिजवलेला रवा, मीठ व चिमूटभर साखर घालून मंदाग्नीवर परतावे.

• १५ मिनिटानंतर उपमा तयार होईल. त्यावर कोथिंबीर पसरून खाण्यास द्यावे. ह्यामध्ये मटार, काजू वगैरे घालून स्वाद वाढवू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.