चिकन तंगडी कबाब

चिकन तंगडी कबाब

साहित्य

• चार पुढचे चिकन लेग्ज
• एक अंडे , बटरचा चुरा
• आले अर्धा इंच
• चार ते पाच लसूण पाकळ्या
• दोन मिरच्या , एक वाटी कोथिंबीर
• तळण्यासाठी तेल
• चवीनुसार मीठ .

कृती

• चिकन लेग्ज धुऊन त्याला थोडयाशा चिरा पाडाव्यात . चिरा पडून झाल्यावर त्यास मीठ लावून थोडा वेळ ठेवावे .

• लसूण पाकळ्या , मिरच्या , एक इंच आल्याचा तुकडा व एक वाटी कोथिंबीर एकत्र वाटून चिकन लेग्जला लावून ठेवावेत .

• अंडे फेसून त्यात एक-एक चिकन लेग्ज बुडवून बटरच्या चुऱ्यात घोळून ठेवावे व दहा मिनिटांनी भरपूर तेलात तळून घेऊन ब्राऊन पेपरवर काढावेत .

• ऐल्युमिनियम फाईलचा तुकडा चिकन लेग्जच्या टोकाला गुंडाळून खाण्यास दयावे . उत्तम स्वादासाठी सॉसबरोबर खावे .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*