चीज इडली

चीज इडली

साहित्य

• दोन वाटया इडली रवा
• एक वाटी उडीद डाळ
• दहा-बारा मेथी दाणे
• अर्धी वाटी किसलेलं चीज
• एक चमचा मिरपूड
• एक चमचा लाल सुक्या मिरचीचा चुरा
• थोडं अमूल लोणी
• चवीला मीठ .

कृती

• डाळ आणि रवा भिजत घालून त्या दोन्हीत थोडे थोडे मेथी दाणे घालावे .

• उडीद डाळ अगदी गुळगुळीत वाटावी . डाळ वाटून होत आली की पाणी निथळून रवा घालून वाटावी .

• त्यात मीठ घालून ती मोठया पातेल्यात झाकण ठेवून रात्रभर अडीचपट फुगेपर्यंत भिजत घालावी .

• सकाळी कुकरमध्ये पाणी उकळत ठेवून , इडली पात्राच्या वाट्यांना तेलाचा हात लावून प्रेत्येकात इडली पीठ टाकून इडल्या तयार कराव्यात .

• तयार केलेल्या प्रत्येक इडलीला लोणी लावावं . वर चीज पेरून त्यावर मिरपूड आणि मिरचीचा चुरा पेरून १८० सेंटीग्रेडवर तापलेल्या ओव्होनमध्ये साधारण तीन-चार मिनिटं चीज वितळेपर्यंत ठेवाव्या . गरम गरम खायला दयाव्या.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.