टोमाटो डोसा

टोमाटो डोसा

साहित्य

• अर्धी वाटी उडीद डाळ
• दोन वाटया तांदूळ
• दोन मोठे घट्ट टोमाटो
• लाल सुक्या मिरचीचा चुरा
• एक चमचा जिरं
• चवीनुसार मीठ .

कृती

• डाळ आणि तांदूळ दोन्ही किमान सात ते आठ तास एकत्र भिजत घालावं .

• गुळगुळीत वाटून घ्यावं . इडलीच्या पिठापेक्षा हे पीठ थोडं पातळ असलं तरी चालेल .

• सकाळी डोसे करायच्या वेळी टोमाटो किसून घ्या . पिठात टोमाटो , जिरं आणि मिरचीचा चुरा घालून डोसे करावे .

• थोडं मीठ घालून , झाकून उबदार जागी फुगत ठेवावं . सकाळी पीठ फुगलं की चांगलं ढवळून घ्यावं .

• डोसा करतेवेळी पीठ पळीनं घोटून घ्यायचं . गरज वाटल्यास थोडं पाणी घालायचं . एका वाटीत तेल आणि दुसऱ्या वाटीत पाणी तयार ठेवायचं .

• बीडचा तवा असेल तर तो तापल्यावर पेपर नैपकिनला तेल लावून तवा पुसून घ्यायचा . मग तवा पुरेसा तापला , की नाही हे बघण्यासाठी त्यावर पाणी शिंपडायचं . गैस मात्र मोठाच हवा .

• पाणी झटकन वाफ होऊन नाहीस झालं , की एक डावभर पीठ मध्यभागी ओतायचं आणि डावाच्या तळानं किंवा वाटीच्या तळानं पीठ भराभर गोलाकार पसरायचं . ही कृती सवयीनं भराभर करता येते . बाजूनं तेल सोडायचं . डोसा कुरकुरीत होतो . दुसऱ्या बाजूनं करायची गरज नाही . त्यानंतर प्रत्येक वेळी पाणी शिंपडायचं , पाणी नाहीस झालं की पीठ पसरायचं आणि तेल सोडायचं

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.