डाळ माखनी

माखनी डाळ

साहित्य

• अर्धा कप उडीद डाळ,
• अर्धा कप राजमा
• पाव कप चणाडाळ
• एक टोमॅटो चिरलेला
• एक कांदा चिरलेला
• दोन टीस्पून लोणी
• अर्धा टीस्पून गरम मसाला
• चवीपुरते लाल तिखट
• मीठ.

कृती

• सर्वप्रथम मसूर, राजमा, चणाडाळ धुवून घ्यावी. डाळी, राजमा, आलं-लसूण पेस्ट, टोमॅटो, मीठ, लाल तिखट, घालून कुकरला शिजवून घ्यावी.

• कढईत लोणी गरम करून त्यात चिरलेला कांदा सोनेरी रंगावर परतवून घ्यावा. त्यात टोमॅटोची पेस्ट घालून पुन्हा परता म्हणजे त्यातील तेल वेगळे होईल.

• त्यात हिंग आणि गरम मसाला घालून मिनिटभर परतावेत. शिजलेल्या डाळी घालून पुन्हा थोडा मंद आचेवर ठेवावा. वाढण्यापूर्वी वरून बटर घालावे, आणि सर्व्ह करावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.