तांदळाची इडली

तांदळाची इडली

साहित्य

• एक वाटी उडीद डाळ
• एक वाटी जाड तांदूळ
• एक वाटी उकडा तांदूळ
• अर्धा चमचा मेथी दाणे
• चवीनुसार मीठ .

कृती

• डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भिजत घालावे . दोन्हीत थोडे थोडे मेथी दाणे घालावे . पाच-सहा तासानंतर तांदूळ रवाळ वाटून घ्या .

• डाळ एकदम बारीक वाटावी . डाळ वाटून होत आली , की त्यात तांदूळ मिसळून परत बारीक वाटावी .

• वाटताना लागेल तसं पाणी घाला . पीठ डावातून सहज पडेल असं हवं .

• मीठ मिसळून मोठया पातेल्यात झाकून उबेच्या जागी रात्रभर जवळजवळ अडीचपट फुगेपर्यंत ठेवा .

• सकाळी कुकरमध्ये पाणी उकळत ठेवा . इडलीपात्राच्या वाट्यांना तेलाचा हात लावून प्रत्येकात डावानं अर्धी वाटी भरेल एवढं पीठ घाला .

• पातेल्यातलं पीठ अजिबात न ढवळता , कडेकडेनं पीठ काढा . म्हणजे फुग मोडणार नाही . सात-आठ मिनिटात इडल्या उकडून होतील .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.