दम आलू

दम आलू

साहित्य

• छोट्या आकाराचे अर्धा किलो बटाटे
• चिमुटभर हिंग
• १/२ चमचा हळद
• १ चमचा मिरची पावडर
• १ मध्यम आकाराचा कांदा
• २ कप दही
• ४-५ तमालपत्राची पाने
• १ चमचा आलं ,लसुन पेस्ट
• ४ चमचे तेल
• १/२ कप दुध
• मीठ चवीनुसार

मसाल्यासाठी :-

• २ वेलदोडे
• ७-८ मिरे
• १ चमचा धने
• १/४ चमचा शहाजिरे
• ४-५ लवंगा
• १ लहान दालचिनी

कृती

• पहिला मसाल्याचे साहित्य मिक्सरमधून बारीक वाटून बाजूला ठेवावे .

• बटाटे प्रथम धुवून बेताचे उकडून सोलावेत .

• कढईत तेल तापवून सर्व बटाटे खमंग तळावेत व बाजूला ठेवावेत .

• कढईत बटाटे तळून उरलेले तेल थोडे कमी करावे व उरलेल्या तेलात कांदा ,हिंग ,तमालपत्र आणि आलं लसुन पेस्ट घालून परतावे .

• हे मिश्रण गुलाबी रंगावर परतला गेला की तेल सुटू लागते .

• नंतर त्यात बारीक वाटून ठेवलेला मसाला मिक्स करून २-३ मिनिटे मध्यम आचेवर झाकून ठेवावे.

• नंतर त्यात हळद ,मिरची पावडर आणि मीठ घालून परतावे .

• नंतर तेल सुटायला लागले की गॅस मोठा करून दही आणि दुध घालून डावाने घोटावे .

• मिश्रण जाड वाटल्यास थोडे उकळते पाणी घालून ढवळावे .

• नंतर त्या मिश्रणात तळलेले बटाटे घालून परतावे .

• सर्व मसाला बटाट्यांना सर्वत्र लागला पाहिजे .आणि गॅस बंद करून भाजीला दोन चांगल्या वाफा द्याव्यात.

• आवडत असल्यास सजावटीसाठी कोंथिबीर घालून सर्व्ह करावे .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.