दलिया सांजा

दलिया सांजा

साहित्य

• एक वाटी दलियाचा रवा शिजवून
• एक वाटी बारीक चिरलेला कांदा
• अर्धी वाटी वाफवलेले मटार
• दोन मोठे चमचे तेल
• तीन-चार हिरव्या मिरच्या
• सात-आठ कढीलिंबाची पानं
• साखर , हिंग , हळद
• एक चमचा लिंबूरस
• फोडणीसाठी मोहरी
• चवीनुसार मीठ .

कृती

• तेलाची फोडणी करून त्यात मिरच्यांचे तुकडे , कढीलिंबाची पानं घालून कांदा परतून घ्यावा .

• मटार घालून परतावे . त्यावर मीठ , साखर , लिंबाचा रस घालून कालवलेला दलिया घालावा .

• यात गाजर , फ्लॉवर , फरसबी अशा वाफवलेल्या भाज्याही घालता येतील .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.