पंजाबी समोसा

पंजाबी समोसा

साहित्य

• अर्धा किलो मटरचे दाणे
• ३-४ फ्लॉवरची फुले
• अर्धे छोटे लिंबू, ७-८ मिरच्या,
• ७-८ लसूण पाकळ्या
• कोथिंबिर
• १ चमचा धने-जिरे पावडर
• १ चमचा तिखट
• हळद
• हिंग
• मीठ
• साखर
• २ वाट्या मैदा
• तळण्यासाठी तेल.

कृती

• कूकरमध्ये मटरचे दाणे व बटाटा शिजवावे, नंतर मैद्यात तिखट, धनेजीरे पूड, थोडी हळद व हिंग, भाजलेले तीळ, चवीपुरते मीठ, चिरलेली कोथिंबीर व अर्धी वाटी तेल गरम करून त्यावर ओतावी.

• हे सर्व मिश्रण कालवून मैदा घट्ट भिजवावा आणि तो २ तास मुरवत ठेवावा.

• बटाटे कुस्करून घ्यावेत. फ्लॉवरची फुले बारीक चिरावी. त्यानंतर मटार, कुस्करलेला बटाटा, चिरलेला कांदा लसूण, मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, चिरलेले फ्लॉवर यामध्ये थोड लाल तिखट, हळद, हिंग, धनेपूड, चवीप्रमाणे मीठ व लिंबू पिळून सर्व मिश्रण परत एकसारखे कालवून घ्यावे.

• भिजवलेल्या मैद्याचा छोटा गोळ घेऊन सर्वात पातळ व मोठी पोळी लाटावी. या पोळीचे तीन भाग करावे. तीन पट्ट्यांवर मटारचे केलेले सारण घालून खणासारखी त्रिकोणी घडी करावी.

• याप्रमाणे सर्व समोसे करून घेतल्यानंतर गुलाबी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर तेलात तेळावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.