पनीर चीज पराठे

पनीर चीज पराठे

साहित्य

• दीड कप कणीक
• पाव किलो पनीर
• अर्धा चमचा कांदा मसाला
• अर्धा चमचा जिरे पूड
• अर्धा चमचा धणेपूड
• अर्धी वाटी चीज स्प्रेड
• अर्ध वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
• दोन मिरच्या बारीक चिरून
• अर्धा चमचा साखर , अर्धा कप मैदा
• डाळीचं पीठ पाव कप , लाटायला मैदा
• एक कांदा बारीक चिरून
• एक डाव तेल , तूप वरून सोडायला .

कृती

• कणीक , मीठ , मैदा आणि डाळीचं पीठ एकत्र करून डावभर गरम तेल घालून मऊ भिजवावं .

• पनीर किसून त्यात कांदा , कोथिंबीर , मिरच्या , धने-जिरे पूड , कांदा मसाला , साखर घालून हलक्या हातानं मिसळावं .

• भिजवलेल्या पीठाचे दहा गोळे करून त्याच्या पातळ पोळ्या लाटाव्यात .

• मग एक पोळी घेऊन तिच्या अर्ध्या भागावर चीज स्प्रेड हातानं लावावं .

• त्यावर पनीर मिश्रण पसरवावं व पोळीच्या उरलेल्या अर्ध्या भागनं ते झाकून कडा दाबून चिकटवाव्या .

• त्यावरून हलकेच लाटणं फिरवावं व तव्यावर तूप सोडून अशा घडया केलेले पराठे भाजावेत . लोणचं किंवा पुदिन्याच्या दह्याबरोबर दयावेत .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.