पापलेटची आमटी

पापलेटची आमटी

साहित्य

• दोन पापलेट
• दहा बेडगी मिरच्या
• पाच लसूण पाकळ्या
• तीन-चार आमसूल
• एक चमचा धणे
• छोटा कांदा
• पाव चमचा हळद
• खोबरे, मीठ

कृती

• पापलेटचे तुकडे कापल्यावर त्याला धुवून मीठ व हळद लावा.

• भिजवलेले धणे व मिरची वाटून घ्या. नंतर हळद, धणे लसूण, मिरची मिक्सरवर बारीक वाटून घ्या.

• त्यात किसलेले बारीक खोबरे, उभा चिरलेला कांदा वाटून घ्या.

• तेलात तयार केलेले वाटण परतवा. नंतर थोडे पाणी घालून उकळी येऊ द्या.

• त्यात पापलेटचे तुकडे हळूवार सोडा. थोडे मीठ घालून ८-१० मिनिट शिजवा.

• नंतर चिरलेली कोथिंबीर व आमसूल घातल्यास चव अधिकच वाढते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.