पालक पनीर

पालक पनीर

साहित्य

• १ जुडी पालक ( २०० ग्रॅम)
• १ कप पाणी
• ५० ग्रॅम पनीर
• १/२ कप किसलेला / बारीक चिरलेला कांदा
• १ टीस्पून आलं-लसूण पेस्ट
• २ चिमुट गरम मसाला
• १-२ हिरव्या मिरच्या
• १/४ टीस्पून हळद
• १/४ टीस्पून धनेपूड
• १/४ टीस्पून जिरेपूड
• १/४ टीस्पून आमचूर
• १ टेबलस्पून दही
• १ टेबलस्पून चीज (optional )
• २ टेबलस्पून तेल
• मीठ चवीप्रमाणे

कृती

• पालकाची पाने खुडून स्वच्छ धुवून घ्या.

• १ कप पाणी पातेल्यात उकळायला ठेवा. पाणी उकळले कि त्यात पालकाची पाने घाला. चिमुटभर मीठ घाला.५ मिनिटे पाने पाण्यात शिजू द्या.

• शिजलेला पालक (उरलेल्या पाण्या सकट) आणि हिरव्या मिरच्या मिक्सर मध्ये घालून बारीक वाटून घ्या.

• पनीरचे चौकोनी तुकडे करून ठेवा . १ चमचा बेसन किंवा तांदळाच्या पिठात २ चमचे पाणी घाला. आणि त्या मिश्रणात पनीरचे तुकडे घोळवा आणि थोड्याश्या तेलात पनीर शालो फ्राय करून बाजूला ठेवून द्या.

• पातेल्यात तेल गरम करा. त्यात आलं-लसूण पेस्ट घाला. खमंग वास सुटला कि कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या.

• मग धने-जिरे पूड ,गरम मसाला आणि १/४ चमचा हळद घालून परता.

• वाटलेला पालक घाला. आमचूर घालून एक उकळी काढा.

• हवे असल्याच किंचित पाणी घाला.आणि मग १ टेबलस्पून दही घालून नीट ढवळा.

• १ टेबलस्पून किसलेले चीज घाला.

• सर्व्ह करायच्या १० मिनिटे आधी पनीर घाला.पनीर आधी घातले तर लगदा होऊन पनीर मोडण्याची शक्यता असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.