पेपर डोसा

पेपर डोसा

साहित्य

• तीन वाटया तांदूळ
• एक वाटी उडीदडाळ
• पाऊण वाटी तूरडाळ
• मुठभर पोहे , तेल
• दोन ते तीन चमचे आंबट दही
• चवीपुरते मीठ .

कृती

• प्रथम तांदूळ व डाळी धुऊन वेगवेगळे भिजत टाकावे . पोहेसुध्दा भिजत टाकावेत .

• आठ तासानंतर ते मिक्सरमधून बारीक करून घ्यावे व एकत्र करावे . त्यात मीठ व दही मिसळून ठेवावे व पीठ आंबण्यासाठी ठेवावे .

• पीठ आंबल्यानंतर तवा गैसवर ठेऊन चांगला तापवावा . त्याला थोडे तेल लावून त्यावर मिठाच्या पाण्याचा शिडकावा करावा .

• नंतर त्यावर हे तयार मिश्रण पळीभरून सोडून वाटीने ते पसरावे व वर झाकण ठेवावे . थोडया वेळाने डोसा आपोआप सुटून येईल .

• त्याची गुंडाळी करावी व खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा बटाट्याच्या भाजीसोबत खाण्यास दयावा

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.