पोळ्यांचा चुरमा

पोळ्यांचा चुरमा

साहित्य

• ५-६ पोळ्या (चपात्या/भाकर्या)
• १ कांदा
• तिखट
• मीठ
• हळद
• १ चमचा साखर
• कडीपत्ता
• जीरे
• मोहरी (फोडणीसाठी)

कृती

• पोळ्यांचा बारीक चुरा करावा (अगदी बारीक होण्यासाठी मिक्सरमध्ये बारीक केले तरी चालेल.) त्यावर थोडेसे पाणी शिंपडावे.

• कांदा बारीक चिरावा. पातेल्यात तेल टाकून त्यात हिंग, कडीपत्ता, जीरे. मोहरीची फोडणी द्यावी. नंतर त्यात कांदा टाकावा व मऊ शिजवावा. त्यासाठी पातेल्यावर झाकण ठेवावे.

• कांदा मऊ झाल्यावर त्यात हळद, तिखट, मीठ टाकून चांगले परतून घ्यावे. त्यामध्ये सर्व चुरमा टाकावा व चांगला परतून घ्यावा. वरुन साखर व बारीक चिरुन कोथिंबीर पेरावी व झाकण ठेवून २-३ मिनीटे शिजवावे व गरमागरम वाढावे.

• पोळ्या शिल्लक राहिल्या असल्यास अशा प्रकारचा चुरमा चांगला लागतो. त्यामूळे शिल्लक पोळ्या टाकून द्याव्या लागत नाहीत.

• ह्यात तुम्ही शेंगदाणे ,शिल्लक भात किंवा इतर आवडीच्या वस्तू घालून चव वाढवू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.