फणसाच्या गऱ्यांची भाजी

फणसाच्या गऱ्यांची भाजी

साहित्य

• जून फणस एक (कापा किंवा बरका)
• तिखट , मसाला मीठ , गुळ
• लाल मिरच्या एक-दोन
• ओलं खोबरं

कृती

• फणस कापून गरे व आठळ्या सोलून घ्याव्यात . गरे फोडून त्याचे दोन भाग करावेत . आठळ्या ठेचून त्यांची सालं काढून त्या पाण्यात टाकाव्यात .

• खळखळून धुवून घ्याव्यात . नंतर त्या कुकरमध्ये उकडून उकडून घ्याव्यात . आठळीवर टरफल राहू देऊ नये .

• थोडी जास्त तेलाची फोडणी करावी . गरे फोडणीला टाकून पाण्याचा हबका मारावा .

• चांगले वाफवले की आठळ्या , मीठ गुळ घालून फडक्यानं पातेल्यातले गरे हासडावेत (म्हणजे वर-खाली हलवावेत .)

• ओलं खोबरं घालावं . फोडणीत लाल मिरच्यांचे तुकडे टाकावेत . ते जास्त खमंग लागतात . या भाजीला ‘गोडा मसाला’ व ‘वेसवार’ घालण्याची कोकणात पद्धत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.