फुलगोबी पकोडा

फुलगोबी पकोडा

साहित्य

• फ्लॉवरचे मोठे तुरे काढून वाफवून घ्या (अर्धवट वाफवा) गार झाल्यावर लिंबाचा रस
• मीठ
• तिखट
• गरम मसाला चोळा.

कृती

• भज्यांच्या पिठाप्रमाणे बेसन भिजवा. त्यात आवडत असल्यास ओवा, जिरेपूड, गरम तेल, मीठ, तिखट घाला.

• पिठात फ्लॉवर बुडवून गरम तेलात भजी तळा. भजी थोडी तळून काढून घ्या. खायला देण्यापूर्वी भजी हाताने दाबून मंद गॅसवर पुन्हा तळून पुदिन्याच्या चटणीबरोबर खायला द्या.

• असे केल्याने भजी कुरकुरीत होतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.