भाजीचे रोल्स

भाजीचे रोल्स

साहित्य

• ३ कप मैदा
• २ कप दूध
• २ अंडी
• चवीपुरते मीठ
आतील सारण
• २-३ गाजरे
• १/२ वाटी मटारचे दाणे
• ७-८ बटाटे
• २ कांदे
• मीठ
• मिरची
• आले
• लसूण
• कोथिंबीर
• अर्धे लिंबू

कृती

• बटाट्याची साले काढून बारीक फोडी कराव्यात. गाजर व कांदाही बारीक चिरुन घ्यावा. आले, लसूण, मिरच्या वाटून घ्याव्यात.

• थोड्या डालडयावर कांदा बदामी रंगावर येईपर्यंत परतून घ्यावा. नंतर त्यात बाकीच्या भाज्या घालून अगदी थोडे पाणी घालून, शिजवून घ्याव्यात.

• भाज्या मऊसर शिजल्यावर सर्व पाणी आटवून घ्यावे. नंतर त्यात मीठ, वाटलेला मसाला, लिंबाचा रस, कोथिंबीर घालून भाजी थाळीत काढून ठेवावी.

• दुधात अंड्यातले पिवळे घालून फेटावे. नंतर त्यात मैदा घालून पीठ तयार करावे. मीठ घालावे. एक तासभर मिश्रण तसेच ठेवावे.

• आयत्या वेळी अंड्यातले पांढरे खूप फेसून त्यात घालावे व डोशाप्रमाणे लहान लहान डोसे करावेत.

• प्रत्येक डोशावर वरील भाजी मध्यभागी १ डावभर घालून जरा पसरुन त्याची डोशाप्रमाणे घडी घालावी.

• दोन्ही कडेची टोके पुन्हा दुमडुन चौकोनी घड्या घालून सर्व डोसे ठेवावेत. आणि सॉससोबत खाण्यास द्यावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.