मजेदार कटलेट्स

मजेदार कटलेट्स

साहित्य

• १ वाटी तयार भात
• १ वाटी सुक्या वाटाण्यांची उसळ
• ४ ब्रेडचे स्लाईस
• १ वाटी वाफवलेला कोबी
• २ मोठे कांदे
• १ इंच आले
• ४/५ हिरव्या मिरच्या
• २-३ डाव चण्याच्या डाळीचे पीठ
• थोडा रवा
• मीठ

कृती

• कांदा बारीक चिरुन घ्यावा व थोड्या तेलावर परतवून घ्यावा. आले व मिरच्याही बारीक चिराव्यात.

• नंतर रवा सोडून इतर सर्व वस्तू एकत्र कराव्यात व त्याचे लिंबाएवढे गोळे तयार करावेत.

• एका छोट्या डिशमध्ये थोडासा रवा टाकून वरील तयार केलेल्या पिठाचा एक गोळा त्यात ठेवून बोटांनी जरा जरा चपटा करावा.

• वरही थोडा रवा घालावा व कागदावर उपडे करावे म्हणजे छान गोल आकाराचे कटलेट तयार होईल.

• त्याच्या कडाही रव्यात घोळाव्यात. ३-४ कटलेट तयार झाली की तव्यावर १ डाव तेल टाकून तांबूस रंगावर तळून घ्यावीत.

• चिंचेच्या चटाणीसोबत खावीत. फार छान लागतात.

• वाट्याण्याची उसळ नसल्यास इतर कुठलीही उसळा चालेल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.