मटण मोगलाई सालन

मटण मोगलाई सालन

साहित्य

• अर्था किलो मटण
• पाव किलो कांदे
• ५-६ लाल मिरच्या
• २ चमचे धणे
• ५-६ मिरी, ३ वेलची
• १ दालचिनी, १ इंच आले
• ७-८ लसूण पाकळ्या
• अर्धा चमचा हळद
• तूप, मीठ
• थोडे केशर, ५-६ बदाम

कृती

• मटणाचे तुकडे करून धुवून घ्या. कांदे पातळ चिरून घ्या. मटणाला मीठ, हळद व धणेपूड चोळून ठेवा.

• तूप तापवून त्यात मटण घालून मोठ्या आचेवर परतत रहा. मटण तांबूस झाले की, त्यात ३ कप उकळते पणी घालून घट्ट झाकण लावून मटण मऊ शिजवा.

• तुपात कांदा परतून बदामी करून घ्या.

• मटण शिजले की, त्यात कांदा घाला. वेलची, दालचिनी व ठेचलेली मिरी घाला.

• जरूर वाटल्यास पाण्याचा शिपका मारून परतत रहा. थोडा वेळ परतवून त्यात २ टेबलस्पून गरम केलेले तूप सोडा.

• बदाम दुधात वाटून घ्या. केशर थोड्या दुधात घोळून घ्या. मटणावर दोन्ही घालून एकत्र करून एक वाफ काढा.

• हे मटणाचे सालन पराठ्याबरोबर सर्व्ह करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.