मटार आणि वांग्याचं भरीत

मटार आणि वांग्याचं भरीत

साहित्य

• मोठं भारताचं वंगं एक
• हिरव्या मिरच्या चार-पाच
• कोवळे मटार दाणे एक वाटी
• फोडणीसाठी तेल
• मोहरी , जिरं
• हिंग , हळद
• कांदे दोन , कोथिंबीर
• चवीनुसार मीठ .

कृती

• वांग्याला तेलाचा हात लावून ते सगळीकडं नीट भाजून घ्यावं . नंतर थोडावेळ पातेल्याखाली झाकावं म्हणजे सालं पटकन निघतात .

• सालं काढून मऊ कुस्करून घ्यावं . तेलात जिरं-मोहरी , हिंग , हळदीची फोडणी करून त्यात बारीक चिरलेला कांदा , मिरचीचे तुकडे , अर्धवट ठेचलेले मटार दाणे घालून परतावं .

• वाफ आणून मीठ व वांगं घालून पुन्हा परतावं . वरून कोथिंबीर घालावी . गरम भाकरीबरोबर वाढावं

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.