मसालेदार अंडी

मसालेदार अंडी

साहित्य

• ६ उकडलेली अंडी,
• २ मध्यम आकाराचे कांदा कापलेले,
• १मध्यम आकाराचा टोमॅटो,
• १/२ चमचा आलं लसूण पेस्ट,
• १ चमचा तिखट,
• कलमी,
• वेलची, लवंगा,
• १/२ चमचा आमचूर पावडर,
• हळद, धने पूड, जिरे पूड मीठ व कोथिंबीर.

कृती

• प्रत्येक अंड्याचे ४ लांब लांब काप करावे.

• तूप गरम करून त्यात लसूण आलं पेस्ट घालून परतावे नंतर त्यात बारीक कापलेला कांदा घालून परतून घ्यावे.

• आता त्यात तिखट, कलमी, वेलची व लवंगा या सर्व मसाल्यांची पूड घालून चांगले परतून घ्यावे .

• नंतर त्यात टोमॅटो घालुन चवीनुसार मीठ घालावे व सर्वात शेवटी कोथिंबीर व कापलेले अंडी घालून सर्व्ह करावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.