मिश्रडाळींचे वडे

मिश्रडाळींचे वडे

साहित्य

• १ वाटी चणा डाळ
• १ वाटी मुगाची डाळ
• १ वाटी उडदाची डाळ
• अर्धी वाटी तुरीची डाळ
• अधी वाटी मसुराची डाळ
• २ सें.मी. आल्याचा तुकडा
• ७-८ हिरव्या मिरच्या
• १ वाटी ओल्या खोबऱ्याचा किस
• १ वाटी चिरलेली कोथिंबीर
• १ चमचा जिरे
• २ चमचे मीठ
• अर्धा चमचा गरम मसाला (असल्यास, नसला तरी चालेल) • तळण्यास तेल

कृती

• सर्व डाळी वेगवेगळ्या भिजत घालाव्या. दोनतासानंतर पुन्हा स्वच्छ धुवाव्या व निथळाव्यात.

• आले-मिरची-जिरे, व मीठ एकत्र वाटावे व डाळीही वाटून घ्याव्या. त्यात खोबरे, कोथिंबीर व मसाला घालावा.

• जास्त तिखट हवे असल्यास थोडॆ लाल तिखट किंवा मिरेपूड घालावी. चमचाभर तेल घालून मिश्रण कालवावे.

• त्याचे छोटे गोल किंवा चपटे वडे करून तळावे.

• चटाणी किंवा सॉसबरोबर खायला द्यावे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.