मुळ्याचा पराठा

मुळ्याचा पराठा

साहित्य

• २ ताजे किसलेले मुळे
• १/२ चमचे लाल मिरची
• १/२ चमचे वाटलेले अनारदाने
• १ कांदा बारीक कापलेला
• १ कापलेली हिरवी मिरची
• १ जुडी कापलेली कोथिंबीर
• १ कप तूप तळणासाठी
• २५० ग्रा. गव्हाचे पीठ
• १ चमचा तूप पीठात मळण्यासाठी
• मीठ चवीनुसार

कृती

• पीठात तुप व मीठ मिळवावे. नंतर किसलेले मुळे, कांदा, हिरवी व लाल मिरची व कोथिंबीर व मीठ मिसळून आवश्यकतेनुसार पाणी टाकुन घट्ट मळावे.

• मळलेल्या पिठाचे बरोबर सहा गोळे करून गोल पराठे लाटावे व दोन्ही बाजुस तूप लावून शेकावावे.

• दही, हिरवी चटणी किंवा लोणच्या बरोबर गरम गरम वाढावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.