लादीपाव । पावभाजीचे पाव ( कुकरचा वापर करून )

लादीपाव

लादीपाव

लादीपाव । पावभाजीचे पाव (कुकरचा वापर करून)

साहित्य :

200 ग्राम मैदा,

1 चमचा बारीक साखर,

1/2 चमचा मीठ,

1 चमचा दूध,

2 चमचे तेल,

दीड चमचा इनो

कृती :
सर्वप्रथम मैदा चाळून घेऊन ह्यामध्ये बारीक साखर, मीठ, इनो आणि दही घालून मिसळून घ्या.
आता या मिश्रणात लागत लागत पाणी घालून 10-15 मिनिटे मळून घ्या.
आता या मळलेल्या गोळ्यामध्ये 2 चमचे तेल टाकून कमीत कमी 10 मिनिटे अजून मळावे.
आता कुकर मध्यम आचेवर 10 मिनिटे तापविण्यासाठी ठेवा. कुकर मध्ये जाळी किंवा स्टॅन्ड ठेवा.
आता एका पात्रात किंवा पसरट डब्याला तेलाचा हात लावा.
आता या मैद्याच्या गोळ्यांचे मध्यम आकाराचे गोळे बनवून डब्यामध्ये ठेवा. या गोळ्यांना दुधाचा हात लावा.
आता या डब्याला 25 ते 30 मिनिटे कुकरमध्ये ठेवा.
कुकरला झाकणाने बंद करू नये फक्त झाकण हळुवार ठेवा.
25 ते 30 मिनिटे झाल्यावर डबा कुकर मधून काढून घ्या.
आता या तयार पावांवर तेल किंवा लोणी लावा जेणे करून पाव कडक होणार नाहीत.
आता या पावांना भाजी बरोबर किंवा चहा बरोबर सर्व्ह करावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.