शेवयांचा उपमा

शेवयांचा उपमा

साहित्य

• दीड कप शेवया (शक्यतो जाड)
• एक कांदा बारीक चिरून
• एक टोमाटो बारीक चिरून
• चार कप पाणी , भोपळी मिरची
• श्रावणघेवडा आणि गाजर (बारीक चिरून)
• मटार – प्रत्येकी पाव वाटी
• दोन मिरच्या लांब तुकडे करून
• अर्धा चमचा किसलेलं आलं
• दहा-बारा कढीलिंबाची पानं
• एक चमचा लिंबूरस
• साखर , दोन मोठे चमचे तेल
• मोहरी , हिंग , जिरं
• ओलं खोबरं , कोथिंबीर
• चवीनुसार मीठ .

कृती

• प्रथम चार कप पाणी उकळायला ठेवावं . त्यात चिमुटभर मीठ घालावं .

• पाणी खळखळून उकळलं की शेवया टाकव्या . शेवया शिजल्या की चाळणीतून पाणी काढून निथळून घ्याव्यात .

• कढाईत तेल घालावं . त्यात मोहरी , जिरं , कढीपत्ता , आलं-मिरच्या घालून थोडं परतल्यावर त्यात प्रथम कांदा घालावा .

• कांदा पारदर्शी झाल्यावर श्रावण घेवडा , गाजर आणि मटार (प्रथम या भाज्या थोडया वाफवून घ्याव्यात) टाकाव्यात .

• नंतर भोपळी मिरची घालावी . शेवटी शेवया घालाव्यात . मीठ , साखर , लिंबूरस घालून हातानं ढवळावं .

• गैस मंद करून झाकण ठेवून एक वाफ दयावी . लगेच बंद करावं . वरून खोबरं आणि कोथिंबीर पेरावी .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.