साबुदाणा भगर व बटाटा चकल्या

साबुदाणा भगर व बटाटा चकल्या

साहित्य

• दोन वाट्या भगर
• चार वाट्या साबुदाणा
• आठ मध्यम आकाराचे बटाटे
• चवीप्रमाणे तिखट
• मीठ
• जिरे
• साखर
• तीन चमचे लोणी

कृती

• रात्री साबुदाणा कोमट पाण्यात भिजवून ठेवावा. सकाळी बटाटे उकडून घ्यावे.

• थंड झाल्यावर सोलावे. साधारणपणे तीन लिटर पाणी उकळत ठेवावे. त्यातील थोडे पाणी काढून बाजूला ठेवावे. भगर स्वच्छ धुवून रोळून उकळत्या पाण्यात टाकावी.

• भगर थोडी शिजली म्हणजे त्यात साबुदाणा टाकावा. भगर व साबुदाणा शिजत आल्यावर त्यात बटाटे किसून पसरत घालावे.

• हे मिश्रण सारखे ढवळून त्यात शिजत असतानाच तिखट, मीठ, जिरे, साखर व लोणी टाकावे.

• जर मिश्रण घट्ट वाटते तर काढून ठेवलेले पाणी हबका मारून पातेल्यावर झाकण ठेवावे. गॅस मध्यम ठेवून पाच-सहा वाफा काढाव्या. चकलीच्या पिठासारखे घट्ट मिश्रण झाले की खाली उतरून ठेवावे.

• चकलीच्या साच्यात आतून पाणी व तुपाचा हात लावून पाण्याच्या हाताने थोडे थोडे मिश्रण मळून घेऊन साच्यातून चकल्या काढाव्यात.

• प्लास्टिकवर त्या उन्हात वाळवाव्यात. तीन/चार उन्हे दाखवून हवाबंद डब्यात भराव्या. तेल किंवा तुपात तळल्यास खूप खुसखुशीत व चविष्ट होतात.

एकादशीचा उपवास असेल तर उत्तम पर्याय म्हणून खाऊ शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.