स्टफ्ड इडली

स्टफ्ड इडली

साहित्य

• दोन ते अडीच कप इडली पीठ
• थोडेसे तेल इडलीच्या कप्प्यांना लावण्यासाठी
• सारण:
• ३/४ कप ताजा खवलेला नारळ
• २ टिस्पून काजू तुकडा
• २ टिस्पून बेदाणे
• २ टिस्पून मिरची-कोथिंबीर पेस्ट
• १/२ टिस्पून किसलेले आले
• १/२ टिस्पून लिंबाचा रस
• चवीपुरते मिठ

कृती

सारणासाठी दिलेले सर्व साहित्य मिक्स करावे. इडली स्टॅंडला तेलाचा हात लावावा.

• इडलीच्या कुकरमध्ये तळाला २ अडीच इंच पाणी गरम करण्यास ठेवावे. इडलीचे कप्पे अर्धे भरावेत. त्यात नारळाचे सारण पेरा. वरून इडलीचे पीठ घालावे.

• १५ मिनिटे इडल्या वाफवाव्यात. ५ मिनिटांनी कुकर उघडून इडल्या काढाव्यात.

गरमच सर्व्ह कराव्यात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.