आलू मेथी

aloo methi recipe marathi

आलू मेथी

साहित्य:

मेथी एक जुडी

बटाटे दोन

तेल तीन चमचे

हिंग चिमूटभर

जिरे एक चमचा

तिखट अर्धा चमचा

मीठ

कृती :

मेथीची पानं खुडून अगदी बारीक चिरावी.

बटाट्याची सालं काढून लहान फोडी कराव्यात.

तेल गरम करून त्यात हिंग, जिरे घालावं.

त्यावर चिरलेली मेथी घालावी आणि कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर परतावी.

मग बटाट्याच्या फोडी, मीठ व तिखट घालून नीट मिसळून झाकण ठेवावं

बटाटे मऊ शिजेपर्यंत मंद आचेवर भाजी शिजवून घ्यावी.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.