शाही चिकन बिर्याणी

amiri-chiken-biryani-recipe-marathi

amiri-chiken-biryani-recipe-marathi

शाही चिकन बिर्याणी

साहित्य :

तीन वाट्या तांदूळ

दीड किलो चिकन

एक वाटी तूप

एक चमचा गरम मसाला

दोन वाट्या दही

आलं लसूण-हिरवी मिरची-कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट पाव वाटी

अर्धी वाटी काजूची पेस्ट

मीठ

एक-दीड वाटी तूप

दोन वाट्या उभा चिरलेला कांदा

पाव चमचा केशर दुधात भिजवून

फोडणीसाठी : आठ लवंगा, तीन दालचिनी च्या काड्या, तीन तमालपत्र.

सजावटीसाठी :

एक वाटी तळलेला कांदा

अर्धी वाटी तळलेले काजू-बेदाणे.

कृती :

चिकनचे बारा-पंधरा तुकडे करून स्वच्छ धुऊन निथळावे.

दह्यात हिरवा मसाला वाटण, मीठ, गरम मसाला आणि काजूवाटण एकत्र करून त्यात ते तुकडे अर्धा तास मुरवावे.

तांदूळ स्वच्छ धुऊन वीस मिनिटं भिजत घालावे. पाच वाट्या पाणी उकळावं.

जाड बुडाच्या भांड्यात तूप तापवून त्यात फोडणीचा अख्खा मसाला परतावा.

त्यावर तांदूळ परतावे आणि मोकळा भात शिजवून तो परातीत उपसून गार करावा. थोडा भात वेगळा काढून त्यात केशर घालावं.

एका भांड्यात तूप तापवून कांदा परतावा. त्यावर मुरलेलं चिकन परतून थोडं गरम पाणी घालून शिजवून घ्यावं.

जाड बुडाच्या भांड्याला तळाशी तूप लावून त्यावर निम्मं चिकन घालावं.

त्यावर निम्मा भात, कांदा, काजू-बेदाणे यांचा थर देऊन वर पुन्हा चिकनचा आणि उरलेल्या भाताचा थर द्यावा.

त्यावर केशरी भात आणि काजू-बेदाणे पसरून उरलेलं तूप गरम करून घालावं आणि कणकेनं भांड्यावरचं झाकण बंद करून बिर्याणी नेहमीच्या पद्धतीनं शिजवावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.