गाजराचा साखर भात

carrot-sweet-rice-recipe-marathi

carrot-sweet-rice-recipe-marathi

गाजराचा साखर भात

साहित्य :

एक वाटी कोणतेही चांगल्या प्रकारचे तांदूळ

गाजराचा कीस दीड वाटी

दीड वाटी साखर

एक वाटी ओलं खोबरं

पाव वाटी दूध

थोडं तूप

एक चमचा वेलदोडा पूड

कृती :

तांदूळ धुऊन अर्धा तासनिथळत ठेवावेत.

नंतर तुपावर परतून त्याचा मऊ मोकळा भात करावा.

गाजर जरा जाडसर किसून घ्यावं. नंतर तुपावर मंद आचेवर हा कीस परतून घ्यावा.

त्यातच ओलं खोबरं घालून परतावं. नंतर साखर घालावी. चांगलं ढवळावं. दूध घालावं.

मोकळा शिजवलेला भात यात घालावा आणि तांदळाचा दाणा न मोडता अल्लाद ढवळावा. तूप सोडावं.

भात अगदी तयार होताना खाली तवा किंवा जाड पत्रा ठेवावा. कारण साखर असल्यानं खाली लागण्याची शक्यता असते.

हा गोड भात गरम किंवा गार चांगलाच लागतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.