चुबक वड्या – Gatte ki Sabji

“गट्टे की सब्जी”

“चूबक वड्या” म्हणतात आमच्या गावाकडे…

“गट्टे की सब्जी” हा पदार्थ राजस्थान कडचा…
पण तसाच पदार्थ आमच्या गावा कडे करतात त्याला चूबक वड्या म्हणतात…. खास करून उन्हाळ्यात करतात…

साहित्य :

तैल भरपूर

तमालपत्र 1

लाल मिर्ची 2

बेसन 1 वाटी

दही 1 वाटी

कांदा 1 मोठा

लसूण 8 ते 10

आलं 1 इंच

टमाटे 2 मध्यम

ओवा अर्धा चमचा

तिखट आवश्यकते नुसार

हळद अर्धा चमचा

गरम मसाला /काळा मसाला 2 चमचे

कसुरी मेथी

मीठ चवीनुसार

जिर पूड 1 चमचा

धणे पूड 2 चमचे

कोथिंबीर

कृती

राजस्थानी भाजी पारंपरिक पद्धती मध्ये खूप जण … कांदा, लसूण, टमाटे वापरत नाही…

प्रथम …
कांदा, आलं, लसूण यांची पेस्ट करून ठेवा.

टमाट्या ची पण पेस्ट करून ठेवा

एका भांड्यात 3 वाटी पाणी गरम करायला ठेवा..

आता एका भांड्यात बेसन घेऊन त्यात गरजेनुसार ओवा, मीठ, तिखट, तैल, टाका थोडी कोथिंबीर टाका.. व या मिश्रणाला दह्याने भिजवा..(आपल्याला अजून काही आवडत असेल तर म्हणजे मीर पूड, तीळ ते पण टाका)

व या बेसनाच्या बोटाच्या आकाराच्या लाट्या करून ठेवा.. एका भांड्यात 3 वाटी पाणी ठेऊन त्याला उकळू द्या व उकळी आल्यावर त्यात या बेसनाच्या लाट्या टाका व 4 मिनटं उकळू द्या…. जेव्हा बेसना च्या लाट्या पाण्यावर आलेल्या दिसतील तेव्हा समजुन जा की गट्टे तयार आहे.

त्या गट्टयाना बाहेर डिश मध्ये थंड होण्या साठी काढून ठेवा..
👍व उरलेलं गरम पाणी फेकू नका तेच पाणी आपल्याला भाजीत वापरायचं आहे.👍

गट्टे थंड झाल्यावर चाकूने बारीक बारीक तुकडे करून घ्या… याला कच्चे गट्टे अस सुद्धा म्हणतात..
कोणी कोणी हे असेच गट्टे सरळ मसाल्यात टाकून भाजी करतात.. पण आपण हे गट्टे तळून घेऊ..

तर एका कढईत भरपुर तैल घेऊन ते गरम करा.
गरम झाल्यावर त्यात गट्टे टाकून गोल्डन रंग येईपर्यंत तळून काढा…
गट्टे तळून झाल्यावर उरलेल्या तैलात 1 तमालपत्र,2 सुखी लालमिर्ची टाका…
चमचा भर मोहरी व जिर टाका….
आणि त्यात आलं,लसूण, कांदा याची पेस्ट टाकून छान खमंगपणा येईपर्यंत परतवा…
आता त्यात हळद,तिखट, धणे पूड, गरम मसाला 1 चमचा, कसुरी मेथी टाकून परत 2ते 3 मिनिट परतवा
त्यात लगेच टमाटो ची पेस्ट टाकून तैल सुटे पर्यन्त परतवा.. (टमाटे आवडत असल्यास टाका)
तैल सुटले की त्यात अंदाजे 5 ते 6 चमचे दही टाकून त्या मिश्रणाला छान मिक्स करत रहा.👍(चमचा हलवत राहिल्याने दही फुटत नाही)👍

परत तैल सुटू द्या..
मग त्यात तळलेले गट्टे टाकून 2 ते 3 मिनट परतवा..आता त्यात “ते” उकळलेले गट्टयाचे पाणी आवश्यकते नुसार टाका.( पाणी जरा जास्त कारण गट्टे पाणी पितात बा..)

चवीनुसार मीठ….

वरून परत गरम मसाला भुरकवा….

कोथिंबीर भुरकवा…..

5 मिनिट मंद आच..

सोबत तैल लावलेल्या पोळ्या…. कांदा,
थोडक्यात काय…आपले महाराष्ट्रीयन पदार्थ पातोडी, किव्हा मास वडी सारखी पद्धत…पण त्यात खोबरे व इतर मसाला नसल्याने व फक्त दही सोबत गट्टे शिजवल्याने एक वेगळी चव…..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*