कोकोनट पुलाव

coconut-pulao-recipe-marathi

coconut-pulao-recipe-marathi

कोकोनट पुलाव

साहित्य :

दोन वाट्या बासमती तांदूळ

नारळाचं दूध तीन वाट्या

अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे पातळ काप

अर्धी वाटी काजू पाकळ्या

लवंग

मिरी

दालचिनी

तमालपत्र

वेलची

दोन मोठे चमचे तूप

अर्धा चमचा कच्चा गरम मसाला

चवीनुसार मीठ

उकळतं पाणी

कृती:

तांदूळ धुऊन निथळावे.

तुपात काजू पाकळ्या आणि खोबऱ्याचे काप तळून घ्यावे.

उरलेल्या तुपात आख्खा गरम मसाला फोडणीला टाकून त्यावर तांदूळ परतावे.

गरम मसाला, मीठ आणि नारळाचं दूध घालून पुलाव शिजवावा.

लागल्यास गरम पाणी घालावं.

काजू आणि खोबऱ्याचे काप घालून वाफ येऊ द्यावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.