दाल तडका

Dal-Tadka-Recipe-marathi

Dal-Tadka-Recipe-marathi

दाल तडका 

साहित्य:

तूर डाळ एक वाटी

मीठ

कांदा एक मोठा

मध्यम आकाराचा टोमॅटो

तिखट अर्धा चमचा

हळद पाव चमचा

लवंगा दोन-तीन

दालचिनी अर्धा इंच

तेल तीन चमचे

जिरे एक चमचा

हिंग चिमूटभर

चिरलेली कोथिंबीर

 

कृती: डाळ स्वच्छ धुवून दोन वाट्या पाण्यात भिजवावी. मग पाणी न निथळता, डाळीत मीठ, हळद, लवंगा, दालचिनी घालावी.

 

प्रेशर कुकरमध्ये शिजायला ठेवावी. शिट्टी झाल्यावर गॅस मंद करून तीन मिनिटं शिजू द्यावी.

 

तेल गरम करून त्यात हिंग व जिरं घालावं. मग कांदा घालून तांबूस होईपर्यंत परतावा. मग टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत परतावं. तिखट घालावं. शिजलेल्या डाळीवर हा गरम तडका ओतावा. वाढण्याआधी वरून कोथिंबीर घालावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.