गंगा जमुना दाल

dal ganga jamuna marathi

dal ganga jamuna marathi

गंगा जमुना दाल

साहित्य :

हरभऱ्याची डाळ एक वाटी

सालासकट उडदाची डाळ अर्धी वाटी

तूप तीन चमचे

एक मोठा कांदा

एक मोठा टोमॅटो

लसूण चार पाकळ्या

आलं अर्धा इंच किसून

मीठ

तिखट अर्धा चमचा

हळद अर्धा चमचा

जिरे एक चमचा

चिमूटभर हिंग

कृती:

दोन्ही डाळी स्वच्छ धुऊन पंधरा वीस मिनिटं भिजू द्याव्या.

हळद, मीठ, लसुण पाकळ्या व किसलेलं आलं घालून अडीच वाट्या पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये शिजायला ठेवाव्या व एक शिट्टी आल्यावर गॅस मंद करून पाच मिनिटं शिजवाव्या.

शिजलेल्या डाळ नीट ढवळून घ्याव्या.

जरूर वाटल्यास थोडं गरम पाणी घालावं.

तूप गरम करून त्यात हिंग व जिरं घालावं.

कांदा घालून तांबूस लाल होईपर्यंत परतावा, मग टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत शिजवावं.

तिखट घालावं आणि गरम गरम हा तडका डाळीवर घालावा

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.