ड्रायफ्रुट पुलाव

dryfruit-pulav-recipe-marathi

dryfruit-pulav-recipe-marathi

ड्रायफ्रुट पुलाव

साहित्य :

तांदूळ एक वाटी

गूळ एक वाटी

बारीक चिरलेला सुकामेवा (आवडीनुसार कुठलाही) पाव वाटी

सुकं खोबरं पातळ काप करून दोन चमचे

वेलची दोन-तीन

लवंगा दोन तीन

तूप दोन चमचे

कृती :

भात अर्धा कच्चा शिजवून घ्यावा.

गूळ घेऊन एक वाटी पाण्यात उकळून विरघळून घ्यावा.

जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून त्यावर वेलची, लवंग, सुकामेवा घालून परतावं.

त्यावर अर्धकच्चा शिजवलेला भात घालून गुळाचं पाणी घालून परतावा.

आवश्यकतेनुसार पाणी घालून भात मंद आचेवर मोकळा शिजवून घ्यावा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.