दुधीचा रायता

dudhi-rayta-marathi-recipe

dudhi-rayta-marathi-recipe

दुधीचा रायता

साहित्य :

दुधी भोपळ्याचा कीस दोन वाट्या

घट्ट दही एक मोठी वाटी

साखर एक चिमूट

गरम मसाला चिमूटभर

हिरव्या मिरच्या दोन

कसूरी मेथी

वाळवलेला पुदिना

मीठ

कृती:

दही फेटून त्यात दुधीचा कीस, चिरलेली हिरवी मिरची, साखर, मीठ, गरम मसाला घालून एकजीव करावं.

त्यावर कसूरी मेथी किंवा वाळवलेला पुदिना घालणं.

पुदिना एक पूर्ण दिवस उन्हात वाळवलेला असावा.

काहीजण दुधी किसून घेतल्यावर पाणी घालून पाच मिनिटं शिजवून घेतात.

शिजवलेला दुधी पाणी काढून गार होऊ द्यावा.

मग दह्यात घालून थोडं मीठ व भाजलेली जिऱ्याची पूड घालून त्यात दुधी घालावा. ढवळून एकजीव करावं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.