फुलगोबी आलू

fulgobi-aloo-recipe-marathi

fulgobi-aloo-recipe-marathi

फुलगोबी आलू

साहित्य :

फ्लॉवर अर्धा किलो

बटाटे दोन मध्यम आकाराचे

चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी

आल्याचा एक इंचाचा तुकडा

मोठे कांदे दोन

तेल दहा-बारा चमचा

हळद पाऊण चमचा

काश्मिरी तिखट एक चमचा

जिरे एक चमचा

हिंग चिमूटभर

कृती:

आलं बारीक चिरून घ्यावं.

कांदे बारीक चिरावे. फ्लॉवरचे मोठाले तुकडे करावेत.

बटाट्याची सालं काढून फिंगर चिप्स सारखे उभट कापावे.

तेल गरम करून हिंग, जिरे घालावं.

त्यावर चिरलेलं आलं घालून ते कुरकुरीत होईपर्यंत परतावं.

मग कांदा घालून तांबूस लाल होईपर्यंत परतावं.

फ्लॉवर व बटाटे घालून मोठ्या गॅसवर तीन-चार मिनिटं परतत राहावं त्यांनतर मीठ व हळद घालून नीट मिसळावं.

झाकण ठेवून भाज्या शिजेपर्यंत मंद आचेवर शिजू द्यावं नंतर तिखट घालून ढवळावं.

वरून गरम मसाला व कोथिंबीर घालावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.