ग्वाल्हेरी बटाटा भात

gwalher-aloo-chawal-recipe-marathi

gwalher-aloo-chawal-recipe-marathi

ग्वाल्हेरी बटाटा भात

साहित्य :

दोन वाट्या बासमती तांदूळ

पाव किलो अगदी लहान आकाराचे बटाटे

एक वाटी उभा चिरलेला कांदा

एक वाटी दही

एक मोठा चमचा हिरव्या मसाल्याचं वाटण

किसलेलं सुकं खोबरं पाव वाटी

पाच लवंगा

दहा-बारा मिरे

दोन इंच दालचिनी

एक मोठा चमचा दगडफूल

अर्धा चमचा शहाजिरं

एक मोठा चमचा धने

दोन सुक्या मिरच्या

थोडं दूध

मीठ

तूप

कृती:

बटाट्याची सालं काढून त्यांना काट्यानं टोचे मारावे.

थोड्या तेलावर सुकं खोबरं आणि गरम मसाला परतून घेऊन बारीक वाटावा.

दही घुसळून त्यात वाटलेला मसाला, मीठ आणि हिरव्या मसाल्याचं वाटण कालवून त्यात बटाटे मुरत ठेवावे.

तांदूळ धुऊन निथळावे. जाड बुडाच्या भांड्यात तूप तापवून मसाल्यातले फक्त बटाटे काढून घेऊन लालसर तळून बाजूला ठेवावे.

उरलेल्या तुपात कांदा लालसर परतून त्यावर बटाट्याचा मसाला परतावा. तांदूळ परतावे.

त्यावर बटाटे घालून तांदळाच्या दुप्पट उकळीचं पाणी घालून आणि चवीनुसार मीठ घालून भात शिजवावा.

तो बोटचेपा शिजल्यावर पातेल्याखाली तवा ठेवून भात पूर्ण शिजवावा.

शेवटी थोडं दूध घालून चांगली वाफ येऊ द्यावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.