जिरा आलू

jeera-aloo-recipe-marathi

jeera-aloo-recipe-marathi

जिरा आलू

साहित्य :

अर्धा किलो छोटे गोल बटाटे

तेल तीन मोठे चमचा

धनेपूड तीन चमचा

हळद एक चमचा

काश्मिरी तिखट एक चमचा

जिरे दोन चमचे

हिंग चिमूटभर

आमचूर एक चमचा

गरम मसाला पाव चमचा

कोथिंबीर अर्धी वाटी

कसूरी मेथी दोन चमचे

मीठ

कृती:

बटाटे धुऊन पुसून घ्यावेत.

तेल तापवून त्यात हिंग, जिरे व अख्खे बटाटे घालून जरा परतून घ्यावं.

मग धनेपूड, हळद, तिखट, आमचूर, गरम मसाला व मीठ घालावं आणि नीट परतून घ्यावं.

झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावं. पाणी मुळीच घालू नये.

बटाटे शिजून मऊ व कुरकुरीत झाले की बारीक चिरलेली कढिलिंबाची पानं, कोथिंबीर आणि कसूरी मेथीची पानं घालून एक दोन मिनिटं परतून उतरवावं.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.